सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या कंपन्या बंद करा - रामदास कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात; तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तत्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तळोजा एमआयडीसीसंदर्भात आढावा बैठक पर्यावरणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. कदम म्हणाले, तळोजा एमआयडीसीमधून मोठ्या प्रमाणावर केमिकल कंपन्यातून सोडण्यात येणारे प्रदूषणयुक्त पाणी कासार्डी नदीमध्ये सोडण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणावर नदी प्रदूषित होत आहे. याचबरोबर आसपासचा परिसर प्रदूषणयुक्त होत आहे.

Web Title: Dranage water process system company close ramdas kadam