ट्रेलरला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

माणगाव : येथील विळे भागात औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरने अचानकपणे पेट घेतला. यात झोपलेल्या चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 28) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

पंकज कृपा शंकर पांडे (43) असे मृत चालकाचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समजते. ट्रेलरमध्ये या वेळी असलेले कॉईलचे सामानही जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या आगीत ट्रेलर जळून खाक झाला असून, आगीची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ही आग लावली की लागली याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: The driver of the trailer died on the spot