

Thane Traffic
ESakal
ठाणे शहर : गायमुख घाटातील खड्डेमय रस्ते आणि बंद पडणारी अवजड वाहने घोडबंदरकरांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहेत. यामुळे येथे रोजच सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नोकरदारवर्गाला कामावर जायला उशीर होतो. सकाळी ६ वाजता अवजड वाहनांना वाहतुकीला परवानगी नसतानाही खड्ड्यांमुळे झालेली रात्रीची कोंडी सुटण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना रोजच कोंडीचा सामना करावा लागतो. परिणामी रोज लेटमार्कचासुद्धा सामना करावा लागतो, तर खड्ड्यांमुळे ठाण्यातून बाहेर पडण्यास उशीर होत असल्याने अवजड वाहनचालकांना वाहतूक विभागाच्या दंडाचा सामना करावा लागतो.