
Zebra crossing
ESakal
ठाणे शहर : रस्ते ओलांडण्यासाठी ठाणे पालिकेकडून विविध चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहेत. सोबतच याच चौकांमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली अडथळेदेखील उभे केले आहेत. त्यामुळे एकीकडे पालिकेचा असा भोंगळ कारभार आणि दुसरीकडे वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. वाहनचालकांकडून स्टॉपलाइन ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी केली जात असून, रस्ता ओलांडायचा कसा, असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे.