मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिली आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांकडून मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्‍यता लक्षात घेता मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने हवाई क्षेपणास्त्राद्वारे मुंबईवर दहशतवाद्यांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ड्रोन, पॅराग्लाइडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आदींवर बंदी घातली आहे.

इंग्लंडवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येक एअरक्राफ्टवर नजर ठेवली जात आहे. ड्रोन बाळगणाऱ्या आणि विकणाऱ्या व्यक्तींची माहिती संघटित केली जात आहे. मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्‍यता मुंबई पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. हे हल्ले ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट किंवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे केले जाऊ शकतात. या भीषण हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे मुंबईत 31 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लाइडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्टवर पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच मुंबई परिसरात ड्रोन उडवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक पोलिस उपायुक्त अश्‍विनी सानप यांनी काढले आहे.

Web Title: dron ban in mumbai