
मुंबई ः शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता हॉटस्पॉट परिसर निर्जतुंकीकरण करण्यासाठी ड्रोनचा उपयोग सुरू करणार आहेत. या द्वारे सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कामाला वेगही येणार असून कर्मचाऱ्यांची सुरक्षाही होणार आहे.
हे वाचा : या मालाचं करायचं काय?
मुंबई पोलिसांकडे सहा ड्रोन आहेत. त्यांच्या मदतीला लष्कराचे दोन ड्रोन आहेत. आत्तापर्यत कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात टेहळणी करण्यासाठी त्यांची मदत घेतली जात होती. आता त्यांचा वापर निर्जंतुकीकरणासाठीही करण्यात येणार आहे. याद्वारे सॅनिटायझरची फवारणी करण्याची तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे. शहरातील धारावी, वरळी, परळ आणि कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या पोलिस वसाहतीत करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनी पालिकेला कळविली असून, पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही फवारणी करण्यात येणार आहे. या निर्जतुकीकरणामुळे मानवी शरीरास काही धोका तर नाही ना ? याची देखील चाचपणी करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांचे सहा ड्रोन आणि हे धारावी परिसरात सॅनिटायझरची फवारणी करणार आहेत. तर लष्कराच्या दोन ड्रोनची पोलिस वसाहतींच्या परिसरात फवारणी करणार आहेत. या फवारणीच्या दरम्यान येथील नागरीकाना घरात थांबण्याचे आवाहन ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.
दोन दिवसांत काम सुरू होणार
ड्रोनच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे, अग्निशमन दलाचा देखील वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर दुसरीकडे या ठिकाणी करण्यात येणाऱ्या फवारणीसाठी आवश्यक ते रसायनासह पालिकेच्या आरोग्य विभागही सज्ज आहे. येत्या दोन दिवसांत ही फवारणी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.