Drug case: अचित कुमारला ९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरु आहे.
Drugs
DrugsSakal

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. आर्यन सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आहे. कोर्टाने आर्यनला आधी एक दिवसाची त्यानंतर तीन दिवसांची सात ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली होती. आता एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनची ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवून मागितली आहे. दरम्यान अचित कुमारला ९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली आहे. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक केल्याची माहिती दिली. अचित कुमार ही नवीन अटक असून आर्यन खानच्या जबानीवरुन त्याला अटक करण्यात आली आहे.

आणखी एखादा छापा मारु शकतो. एखाद्या नवीन आरोपीला अटक केल्यानंतर आधीपासून अटकेत असलेल्या आरोपीसमोर बसवून चौकशी करायची गरज लागू शकते. त्यामुळे एनसीबीने कोठडी वाढवून मागितली आहे. विशेष सरकारी वकिल अद्यावैत सेठाना एनसीबीकडून युक्तीवाद करत आहेत.

एनसीबीचे अधिकारी रात्रंदिवस काम करतायत. आरोपींची कस्टडी हवी आहे जेणेकरून चौकशी करता येईल, असे एनसीबीचे वकील अद्वैत सेठना म्हणाले. अचित कुमारला नऊ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीने कोठडी दिली आहे.

अचितचे वकील म्हणाले...

NCB खोटं बोलत आहे. अचितची अटक ही अवैध आहे. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. जो मी रेकोर्ड वर ठेवतो. NCB च म्हणणं आहे की अचित सप्लायर आहे. मग सेक्शन का नाही टाकले? असा सवाल त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com