दहिसरमधून अमली पदार्थ जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - अमली पदार्थांच्या (एलएसडी) विक्रीसाठी आलेल्या दोघांना कांदिवली अमली पदार्थ विरोधी कक्षाने मंगळवारी (ता. 2) अटक केली. सॅमसॉन रोझारिओ आणि रोहन राजू ओव्हळ अशी त्यांची नावे आहेत. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या एलएसडी डॉट्‌सची किंमत सव्वा दोन लाख इतकी आहे. 

सॅमसॉन आणि रोहन हे दोघेही मीरा रोड परिसरात राहतात. त्या दोघांची काही महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. तेव्हापासून ते अमली पदार्थांची विक्री करत आहेत. सॅमसॉन हा गेल्या महिन्यात नेपाळला गेला होता. तेथील एकाने सॅमसॉनला एलएसडी दिले होते. रोहन हा सॅमसॉनकडून अमली पदार्थ घेऊन परिचयातील लोकांनाच त्याची विक्री करत असे. 

Web Title: Drug seized