esakal | "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं नाहीत"; BMCची हायकोर्टात माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Corona

"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं नाहीत" - मुंबई महापालिका

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबईमध्ये लसीकरण मोहीम व्यवस्थितपणे सुरु असल्यानं तिसरी लाट येण्याची चिन्हं दिसत नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टात दिली आहे. शहरात ४२ लाखांहून अधिक लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर ८२ लाखांहून अधिक लोकांनी एक डोस घेतला आहे, असंही पालिकेनं हायकोर्टात सांगितलं.

हेही वाचा: आर्यन खानसह तिन्ही आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी हायकोर्टाला सांगितलं की, "अंथरुणाला खिळलेल्या २,५८६ लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर अशाच ३,९४२ लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. अद्यापही लसीकरण मोहिम व्यवस्थित सुरु आहे. सध्या लसीचा कुठलाही तुटवडा भासत नाही. मुंबई कोरोनापासून सुरक्षित आहे. आम्हाला कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हं दिसत नाही"

हायकोर्टात दाखल केली होती जनहित याचिका

या वर्षाच्या सुरुवातीला अॅड. धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल करत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने ७५ वर्षांवरील नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच अंथरुणाला खिळलेल्या अपंग व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लस द्यावी, अशी मागणी केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठानं सुनावणी घेतली यावेळी पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी हायकोर्टाला याबाबत माहिती दिली.

केंद्राच्या आधीच महाराष्ट्रानं घरोघरी लसीकरण सुरु केलं

सुरुवातीला केंद्र सरकारने घरोघरी जाऊन लस देणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. पण गेल्या महिन्यात याला मान्यता दिली. सप्टेंबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, घरोघरी लसीकरणाबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण तत्पूर्वीच महाराष्ट्र सरकारनं पायलट प्रोजेक्ट म्हणून अंथरुणाला खिळलेल्या लोकांना लसीकरण मोहिम सुरु केली होती.

loading image
go to top