esakal | 'ही वेळसुद्धा निघून जाईल'; सेलिब्रिटींचा शाहरुखला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh celebs

Aryan Arrested: 'ही वेळसुद्धा निघून जाईल'; सेलिब्रिटींचा शाहरुखला पाठिंबा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Drugs Case : प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनसह Aryan Khan आठ जणांना रविवारी अटक केली. या कारवाईनंतर अभिनेत्री पूजा भट्ट आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांसारख्या सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दर्शविला आहे. पूजाने 'चाहत' तर सुचित्राने 'कभी हा कभी ना' या चित्रपटात शाहरुखसोबत काम केलं होतं. पूजाने ट्विट करत लिहिलं, 'मी तुझ्यासोबत आहे. तुला आमची गरज आहे अशातला भाग नाही. पण तरी माझा पाठिंबा आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल.'

पूजाप्रमाणेच सुचित्रानेही ट्विट करत शाहरुखला साथ दिली. 'मुलांना संकटात पाहण्यापेक्षा कठीण पालकांसाठी काहीही नसतं. सर्वांसाठी प्रार्थना. बॉलिवूडला लक्ष्य करणाऱ्यांना एनसीबीने आतापर्यंत चित्रपट स्टार्सवर टाकलेले छापे लक्षात आहे का? त्यांना काहीही सापडलं नाही आणि काहीच सिद्ध झालं नाही. हा फक्त तमाशा आहे. ही प्रसिद्धीची किंमत आहे,' असं ती म्हणाली.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला मोठा दिलासा

सलमानने घेतली शाहरुखची भेट

या घटनेनंतर अभिनेता सलमान खान याने शाहरुख खानची त्याच्या मन्नत बंगल्यावर जाऊन भेट घेतली. सलमान कारमधून शाहरुखच्या बंगल्यावर आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आर्यनला अटक झाल्यानतंर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी सलमान त्यांच्या घरी धाव घेतल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानच्या अटकेनंतर जया बच्चन का होतायत ट्रोल?

सुनिल शेट्टीचं ट्विट

'जेव्हा त्या क्रुझवर छापा टाकण्यात आला, तेव्हा जे घडलं ते प्रामाणिकपणे समोर येण्याची गरज आहे. कुणा एकाचे नाव घेऊन बाकीच्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. अनेकांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र नावं काहींचीच समोर आली आहे. अजून तपास सुरु आहे. तेव्हा लोकांनीदेखील थेट निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत पडू नये. तसेच अधिकाऱ्यांनी देखील जे दोषी आहेत त्या सगळ्यांची नावं जाहीर करावीत,' असं ट्विट सुनिल शेट्टीने रविवारी केलं.

loading image
go to top