डोंबिवलीत घरातच सुरू होता ड्रग्सचा कारखाना; NCBने केली कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

डोंबिवलीत घरातच सुरू होता ड्रग्सचा कारखाना; NCBने केली कारवाई

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा गेल्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचं ड्रग्स कनेक्शन हा चर्चेचा विषय ठरला. बॉलिवूडला ड्रग्सची कीड लागल्याचे आरोप अभिनेत्री कंगना रानौत हिने केले. याच मुद्द्यावरून आजकालच्या तरूण पिढीत ड्रग्स सेवनाचे प्रमाण वाढल्याबाबतच्या चर्चाही रंगल्या होत्या. तशातच आज मुंबईतील डोंबिवली परिसरात घरातच सुरू असलेला ड्रग्सचा एक कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. हायटेक ड्रग्स बनवणारा कारखाना NCB कडून उद्ध्वस्त करण्यात आला. डोंबिवलीच्या पलावा सिटीत ही कारवाई करण्यात आली. घरामध्येच हायड्रोफोनिक वीड (गांजा) बनवणारी टोळी NCBकडून जेरबंद करण्यात आली. या कारवाई दरम्यान १ किलो हायड्रोफोनिक वीड जप्त करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली.

हेही वाचा: मुंबईत बनवली जाणार कोरोनावरील लस

काही लोक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्सईड आणि इतर घटक वापरून घरात ड्रग्स तयार करत आहेत आणि त्याची शेती करत आहेत, अशी माहिती NCB ला मिळाली होती. सुरुवातीला NCBच्या अधिकाऱ्यांनी वर्सोवा परिसरात छापा टाकला. त्या छाप्यात दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे NCB चे अधिकारी डोंबिवलीच्या फॅक्टरीमध्ये गेले. तेथे घरातच पाण्यामध्ये कॅनबीची शेती केली जात होती, असं उघडकीस आलं. मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांमध्ये एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.

हेही वाचा: हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन करणार नाही!!

ज्या ड्रग्सची लागवड केली जात होती, तो ड्रग्स कोणीही असंच खरेदी करू शकत नाही. या ड्रग्सचे सीड्स अमेरिकेवरून आणले जात होते. डार्क वेबवर या एका सीड्सची किंमत सुमारे १५ डॉलर्स इतकी आहे असं सांगितलं जात आहे. तसंच काळ्या बाजारात अंदाजे १५ हजाराला हे सीड्स मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. NCBने हे सर्व साहित्य ताब्यात घेतलं असून आणखी कुठे अशा पद्धतीने कारखाना चालवला जातोय का याचा तपास NCBकडून केला जात आहे.

loading image
go to top