esakal | मुंबईत बनवली जाणार कोरोनावरील लस
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत बनवली जाणार कोरोनावरील लस

मुंबईत बनवली जाणार कोरोनावरील लस

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या संदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे, अशी माहिती विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्राद्वारे दिली.

हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन करणार नाही!!

सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे. तसेच हाफकिन मध्ये या दृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असेही माहिती विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून आलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर, आता या संदर्भातील प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.

रेमडेसिवीर तयार पण सरकारी परवानगीमुळे रखडला पुरवठा

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या व्हिडीओ संवादात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिनला लस तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात असून राज्यात लसीचा जादा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच, मुंबईतील हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल. राज्य आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्यांपेक्षा जास्त करण्याकडे व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवण्याच्या दृष्टीने लक्ष देत आहे. मात्र त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

ड्रग्ज प्रकरण: कतारमध्ये शिक्षा भोगणारं जोडपं मुंबईत परतलं

याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. राज्यातील कोरोनास्थिती बिकट असल्याने अशा परिस्थितीत १०० टक्के लसीकरण गरजेचे आहेत. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची परवानगी द्यावी. तसेच लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातील इतर संस्थांना, उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक, यांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनीही केली होती.

(संपादन- विराज भागवत)

loading image