डोंबिवली : दारु पिऊन थेट मानपाडा पोलिसांना करायचा फोन; आरोपी गजाआड

Culprit arrested
Culprit arrestedsakal media

डोंबिवली : दारू पिल्यावर त्याचे पत्नीसोबत (husband-wife dispute) भांडण होत असे. तो राग काढण्यासाठी तो मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police station) फोन करून पोलिसांना शिवीगाळ करत असे. असा वर्षभर त्याचा खेळ सुरू होता. रात्री अपरात्री येणारे त्याचे फोन, (call to police) हे भांडण पोलिसांच्या डोक्याला जणू तापच झाले होते. एवढेच नाही जस्ट डाईलवरुन मानपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांचा मोबाईल नंबर मिळवून त्याने त्यांनाही त्रास दिला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात हेमंत याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Police FIR Filed) करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक (culprit arrested) केली आहे. हेमंत कन्सारा (वय 35) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या घरी त्याला जाब विचारण्यास गेलेल्या पोलिसांनाही त्याने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.

Culprit arrested
BMC चे संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य; २० ते २२ हजार नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक

डोंबिवली पूर्वेत देसलेपाडा परिसरात राहणारा हेमंत कंन्सारा (वय 40) हा गेले वर्षभर मानपाडा पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना त्रास देत होता. जस्ट डाईलवरुन त्याने मानपाडा पोलिस ठाण्याचा तसेच वरिष्ठ पोलिस निरिक्षकांचा मोबाईल नंबर मिळविला. त्यानंतर त्या नंबरवर कॉल करुन पोलिसांना शिविगाळ केली. याप्रकरणी सोमवारी दुपारी मानपाडा पोलिस पथक हेमंत याच्या घरी चौकशीसाठी गेले.

यावेळी त्याने पोलीस नाईक महादेव पवार यांच्या शर्टाची कॉलर पकडून पोलिस हवालदार विजय कोळी व सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत आंधळे यांना धक्का मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात घेऊन येत असतानाही त्याने सहाय्यक पोलिस निरिक्षक आंधळे यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. पोलिस नाईक महादेव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हेमंत याच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हेमंतला अटक केली असून याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक सुरेश डांबरे करीत आहेत.

Culprit arrested
मुंबई : पोद्दार शाळेने केली कंत्राटदार, शाळेच्या परिवहन अधिकाऱ्यावर कारवाई

पोलीस स्टेशनमध्ये हेमंत कान्सरा नावाचा तरुण मुलगा रात्रीचा दारू प्यायचा आणि पोलीस स्टेशनच्या फोनवर किंवा लॅन्ड लाईनवर फोन करून तो अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायचा. अनियमितवेळा वेगवेगळ्या फोनवरून फोन करत असे. गेल्या एक वर्षापासून हा सर्व प्रकार चालला होता. पाडव्याच्या दिवशी त्यांनी असेच रात्रीचे फोन केले. या प्रकरणी ड्युटी ऑफिसर यांना कळवले. त्यानंतर आम्ही त्याचा नंबर वरून शोध घेतला व त्याला पकडण्यासाठी आमची पोलीस गेले असता त्यांना सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्याची कॉलर पकडली म्हणून त्याच्यावर 353 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

- शेखर बागडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com