मुंबई : पोद्दार शाळेने केली कंत्राटदार, शाळेच्या परिवहन अधिकाऱ्यावर कारवाई

School Bus
School Busesakal

मुंबई : विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊन तब्बल चार ते पाच तास फिरवणाऱ्या सांताक्रूझ येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेतील (Poddar international school) प्रकरणाची शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गंभीर दखल घेतल्याने आज शाळेकडून तात्काळ खुलासा देण्यात आला. यामध्ये शाळेने आपल्याकडे लावण्यात आलेल्या बसच्या कंत्राटदार (Bus contractor), शाळेतील परिवहन अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित (school employee suspended) केले असल्याची माहिती आपल्या खुलाशात दिली आहे. तसेच यापुढे असा प्रकार आमच्याकडून होणार नसल्याची हमीही या खुलाशात शाळेने लिहून दिली आहे.

School Bus
बेरोजगारीच्या झळा! राजस्थानच्या तरुणाचा भिलवाडा ते मुंबई पायी प्रवास

बस पाच तास गायब असल्याने काल सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पाश्वभूमीवर शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी पोद्दार इंटरनॅशनल शाळेला नोटीस बजावून तात्काळ खुलासा मागवला होता. त्यासाठी आज शाळा परिसरात शिक्षण उपसंचालक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जाऊन भेटही दिली.

तर शाळेने केलेल्या खुलाशात शाळेकडून झालेल्या प्रकारावर दिलगीरी व्यक्त करत यासाठी कंत्राटदार आणि शाळेतील परिवहन अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच या प्रकरणाची शाळा व्यवस्थापन समितीकडून चौकशीही केली जाणार असून त्या चौकशीत जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानंतर पुढील कारवाईसाठी पाऊले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पोद्दार इंटरनॅशनल शाळेत झालेला प्रकार हा गंभीर होता. मात्र आज शाळेने आपल्याकडे खुलासा सादर करून त्यात केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. आता शाळा व्यवस्थापन समितीकडून होणाऱ्या चौकशीत समोर येणारी वस्तुस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

- संदीप संगवे, शिक्षण उपसंचालक, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com