मुंबई : मद्यपीने मारली लोकलखाली उडी; मध्य रेल्वे विस्कळीत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

गुरूवारी (ता.19) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कुर्ला स्थानकाजवळ एक अज्ञात व्यक्ती मद्यपान केल्यानंतर रेल्वे रूळ  ओलांडण्याच्या बहाण्याने कल्याण लोकलच्या खाली उडी मारली.

मुंबई : मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकाजवळ कल्याण लोकलसमोर एका अज्ञात व्यक्तीने उडी मारली. त्यामुळे कल्याण दिशेने धिम्या गतीने जाणाऱ्या लोकल रात्री ठप्प करण्यात आल्या होत्या.

- ... म्हणून धनंजय मुंडे भिडले पोलिस अधिक्षकांशी!

गुरूवारी (ता.19) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कुर्ला स्थानकाजवळ एक अज्ञात व्यक्ती मद्यपान केल्यानंतर रेल्वे रूळ  ओलांडण्याच्या बहाण्याने कल्याण लोकलच्या खाली उडी मारली. ऐन गर्दीच्यावेळी अपघात झाल्यामुळे कल्याण दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या होत्या.

- सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर

या अज्ञात व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ)ने सुखरूप जिवंत बाहेर काढले. मात्र, त्याच्या उजव्या पायाला मार लागला असल्याने त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drunkn man attempt to suicide on local train track at Kurla railway station in Mumbai