मुंबईतही लसीकरणाच्या हालचाली वेगवान, जाणून घ्या मुंबईतील लसीकरणाचे पाच टप्पे

मुंबईतही लसीकरणाच्या हालचाली वेगवान, जाणून घ्या मुंबईतील लसीकरणाचे पाच टप्पे

मुंबई : एकीकडे देशभरात आजपासून कोरोना वॅक्सीनची ड्राय रन सुरु झालीये. नागरिकांना कोरोना लस देता यावी याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत देखील हालचाली वेगवान झाल्यात. मुंबईकरांना कोरोनाची लस मिळावी म्हणून लसीकरण मोहिमेसंबंधीची तयारी अधिक वेगवान झालीये.

मुंबईकरांना सुलभ पद्धतीने लसीकरण करता यावे यासाठी गेल्या १४ दिवसांमध्ये ७६२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबतचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यानंतर या ७६२ प्रशिक्षकांनी तब्बल अडीच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लास देण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. 

मुंबईत बिनदिक्कत लसीकरण करता यावं यासाठी मुंबई महानगर पालिकेने लसीकरणाची ब्लु प्रिंट तयार केलीये. ज्यान्वये मुंबईत पाच टप्प्यात लसीकरण मोहीम पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल सव्वा लाख डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यामध्ये सुरवातीला लसीकरण नेमकं कसं करावं, काय काळजी घ्यावी? यावर लक्ष दिलं जाणार आहे.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून 'कोव्हीन ऍप' कसं वापरावं, लस दिली जाणाऱ्या नागरिकांची यामध्ये कशी माहिती भरावी. नक्की ऍप्लिकेशनचा कसा वापर करावा, यावरही अधिक भर देण्यात येणार आहे. 

या ट्रेनिंगनंतर पुढे तिने टप्प्यांमध्ये मुंबईकरांना लस मुलू शकेल. 

तिसरा टप्पा 

  • खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील 1 लाख 25 हजार  कर्मचाऱ्यांचे लसीकरण 

चौथा टप्पा 

  • निम वैद्यकिय कर्मचारी, कोविड संबांधात काम केलेलेल पालिकेचे आणि खासगी सफाई कर्मचारी, इतर फ्रंटलाईन कर्मचारी, पोलिस, बेस्टचे कर्मचारी, राज्य परीवहन सेवेचे कर्मचारी. या टप्प्या ऐकून 5 ते 6 लाख नागरिकांचा समावेश असेल.

पाचवा टप्पा 

  • 50 वर्षावरील नागरीक तसेच सहव्याधी दमा, मधुमेह,  हृदयविकार तसेच काही दिर्घकाली आजार असलेले रुग्ण यांना लस देण्यात येईल. 

असे होईल लसीकरण

लसीचे दोन डोस 21 ते 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येतील. लसीकरणासाठी चार कर्मचारी असतील.  प्रत्यक्ष लस देणारा, ओळख तपासणारा, मदतनीस आणि सुरक्षा पाहाणारा अशा पद्धतीने कर्मचारी असतील. लस घेतल्यानंतर संबंधीत व्यक्तीला 30 मिनीटे केंद्रात थांबावे लागणार. या काळात संबंधित व्यक्तीवर काही साईड इफेक्ट दिसतात का यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 

dry run of corona vaccine starts know all five steps drafted by BMC for citizens of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com