सरासरी गुणांनी अकरावीच्या शेकडो विद्यार्थ्यांचा केला घात; दहावीत गुणवंत, अकरावीत नापास

सरासरी गुणांनी अकरावीच्या शेकडो विद्यार्थ्यांचा केला घात; दहावीत गुणवंत, अकरावीत नापास

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीची वार्षिक परीक्षा रद्द झाल्याने वर्षभरातील सरासरी गुणांच्या आधारे अकरावीचा निकाल काही महाविद्यालयांनी जाहीर केला आहे. परंतु या सरासरी गुणांनी अकरावीच्या शेकडो विद्यार्थ्यांचा घात केला आहे. दहावीच्या परीक्षेत 80 ते 90 टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी अकरावीत नापास झाले आहेत. या शिक्षण परिषदेने अकरावीची परीक्षा घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दहावी निकाल वेळेत जाहीर झाला तरी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबल्याने दरवर्षी महाविद्यालये सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजाडतो. लागोपाठ होणाऱ्या परीक्षांमुळे महाविद्यालयाच्या वातावरणाशी, इंग्रजी क्लचरशी जुळवून घेता घेता अभ्यास करायला विद्यार्थ्यांना वेळच मिळत नाही. घटक चाचणीनंतर 40 दिवसांत प्रथम सञ परीक्षा होते. दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेच 30 दिवसांत दुसरी घटक चाचणी परीक्षा झाली. बहुसंख्य विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये काठावर गुण मिळाले आहेत. या तिन्ही परीक्षांची सरासरी काढली असता शेकडो विद्यार्थी यंदा अकरावीत नापास झाले आहेत.

अकरावीत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीची तयारी करता यावी यासाठी एसएमएस आणि ईमेलद्वारे निकाल कळविला. काही महाविद्यालयांनी केवळ पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच निकाल कळविला आहे. इतर विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहे. रूपारेल (माटुंगा), रुईया (माटुंगा), चेतना (वांद्रे) , मिठीबाई ( विलेपार्ले) , वाणी विद्यालय (मुलुंड) , सोमैया ( विद्याविहार), या काॅलेजेसनी निकाल लावून केवळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कळवले आहे. मालाड येथील गौरीदत्त मित्तल या महाविद्यालयाने निकाल जाहीर केला असून 719 पैकी 201 विद्यार्थी नापास केले आहेत, अशी माहिती ज्युनियर काँलेज टीचर्स असोसिएशनचे सचिव प्रा.मुकुंद आंधळकर यांनी दिली. 

सर्वच विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश द्या : 

राज्य सरकारने अकरावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर करावे. त्यामुळे विद्यार्थी निश्चिंत होऊन बारावीची तयारी करायला लागतील. यावर्षी राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी बारावीचा आॅनलाईन अभ्यास करायला आत्तापासूनच सुरुवात करतील. त्यांना बारावीच्या/ स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळेल. पर्यायाने चांगला अभ्यास होऊन बारावीत तसेच स्पर्धा परीक्षेत  ते उत्तम गुण मिळवतील, असेही आंधळकर यांनी सांगितले. 

अकरावी परीक्षा प्रकिया वेळेत पूर्ण न झाल्याने विद्यार्थांना अभ्यास पूर्ण करण्यास वेळ मिळाला नाही. सरासरी गुण देण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थाचे नुकसान झाले आहे. विद्यार्थी नापास झाल्याने त्यांची परीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक परिषेदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

नापास विद्यार्थ्यांना 17 नंबरचा पर्याय

अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा अर्ज भरून बारावीची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश दिल्यास 17 नंबरच्या अर्जाचे प्रमाण कमी होणार आहे.

विद्यार्थ्यांची व्यथा
- सुरूवातीचे सहा महिने इंग्रजी माध्यम व महाविद्यालयीन वातावरण समजून घेण्यातच जातात.
- त्यामुळे पहिल्या सत्रात खूप कमी गुण मिळतात, नंतर वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर व इंग्रजी माध्यमाचा सराव झाल्यानंतर विषय चांगला समजू लागतो आणि त्यामुळे दुसऱ्या सत्रात चांगले गुण मिळवतात.

due to average mask testing system many students failed in first year junior college  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com