अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात? जाणून घ्या नेमकं प्रकरण...

Ravi-Pujari
Ravi-Pujari

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिस सध्या तयारी करत आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आफ्रिका खंडातील सेनेगल या देशातून त्याला अटक करण्यात आली होती. 2017 सालच्या बिल्डर सुब्बा राव यांच्या हत्येप्रकरणी सध्या तो बंगळुरू पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध 49 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी 19 गुन्ह्यांवर मुंबई पोलिसच कारवाई करतील, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

मुंबई पोलिस गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, उर्वरित 30 घटनांची सीबीआय चौकशी करीत आहे. इतर गुन्हे बऱ्याच वर्षांपूर्वी घडले होते आणि म्हणूनच्या त्याच्या विरूद्ध पुरावा शोधणं थोडंफार कठीण होईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, पुजारीवरील नऊ खटल्यांचा तपशील घेऊन आम्ही सेनेगल सरकारला पत्र लिहिले होतं. ज्यासाठी आम्ही मुंबईत त्याच्यावर कारवाई करु शकतो. 

स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला सेनेगलमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. पुजारी काही वर्षांपूर्वी छोटा राजनचा सहकारी होता. राजनची साथ सोडल्यानंतर त्याने स्वत:ची गॅंग बनवली. 

या नावानं राहायचा सेनेगलमध्ये 
रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने तिथे राहायचा. सेनेगलमधील तपास यंत्रणांच्या लेखी याच नावाची नोंद होती. बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट त्याच्याकडे होता. रवी पुजारीचे आधी थायलंड, मलेशिया, मोरोक्को या देशांत बस्तान होते. त्यानंतर तो पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रिपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांतही तो वावरला. गेल्या आठ वर्षांत पुजारीने सेनेगल, बुर्किना फासो या देशांत 'नमस्ते इंडिया' नावाने अनेक रेस्टॉरंट उभारली. सेनेगलची राजधानी डकारमध्ये जवळपास गेल्या दशकभरापासून तो पत्नी, मुलांसह राहत होता.

अनेक राज्यात गुन्हे दाखल
रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हत्या आणि खंडणीचे 200 हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. कर्नाटकात बंगळुरूमध्ये 39, मंगळूरमध्ये 36, उडुपीमध्ये 11 तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहे.  महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध 49 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील 26 गुन्हे मकोकाखाली दाखल झालेले आहेत. गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी 75 गुन्ह्यांची नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com