पुराच्या पाण्याने जीवघेण्या लेप्टो संसर्गाचा धोका, कशी होते लागण आणि कशी घ्याल काळजी, जाणून घ्या

सुमित बागुल
Saturday, 17 October 2020

राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातलं. पर्जन्यछायेच्या भागांमध्ये देखील पूरस्थिती पाहायला मिळतेय.

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातलं. पर्जन्यछायेच्या भागांमध्ये देखील पूरस्थिती पाहायला मिळतेय. पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालंय. एकीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून घेतला गेलाय. तर दुरीकडे नागरिकांमध्ये आता पुराच्या पाण्यामुळे साथीच्या रोगाची भीती निर्माण झालीये. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यतील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालं.

रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली. पुराच्या पाण्यामुळे आता लेप्टोस्पायरसिस धोका बळावला आहे. त्यामुळे कुणालाही थंडी, ताप, खोकला, स्नायू दुखणे, कावीळ, अतिसार अशी लक्षणं असतील तर त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी आणि उपचार घेण्याच्या सूचना करण्यात येतायत.

महत्त्वाची बातमी : भाजपच्या आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणालेत, "काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!"

लेप्टोस्पायरसिसचा संसर्ग स्पायरल आकाराच्या जिवाणूपासून होतो ज्यास लेप्टोस्पायरा असं म्हणतात. लेप्टोच्या संसर्गामुळे मूत्रपिंडाची समस्या, श्वसनविषयक त्रास, यकृत निकामी होणे आणि मेनिन्जायटिस (मेंदूच्या संरक्षण कवचावरील सूज) असे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. 

कशी होते लागण ? 

लेप्टोची लागण प्राण्यांच्या लाघवीपासून होतो. हे जिवाणू पाळीव प्राण्यांच्या लघवीमध्ये आढळून येतात. गाई, गुरं, कुत्रे, मांजर, घोडे यांच्या लघवीमध्ये हे जिवाणू आढळतात. उदरांमुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. हे जिवाणू मानवी शरीरात विविध पद्दतीने प्रवेश करू शकतात. ज्यामध्ये पायांवरील जखम, किंवा डोळे, नाक किंवा दुभंगलेल्या त्वचेचाही समावेश आहे.     

महत्त्वाची बातमी : भिवंडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलेची हत्या

लेप्टोच्या स्टेजेस काय आहेत ?

पहिल्या स्टेजमध्ये लेप्टोमुळे ताप येणं, डोकेदुखी होण, मळमळ आणि उलट्या होणे किंवा  स्नायू दुखणे ही लक्षणं असतात. तर स्टेज दोनमध्ये मूत्रपिंड आणि यकृत निकामी होणे, मेनिन्जायटिस सोबतच डोळ्यातील बुबुळ किंवा मज्जातंतूचा प्रतिकार किंवा सूज येण्यासारखी गंभीर लक्षणं देखील उद्भवू शकतात.  

कशी घायल काळजी ? 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दूषित किंवा संक्रमित प्राण्यांशी संपर्क टाळणे. पाळीव पशु प्राण्यांची स्वच्छता करताना सुरक्षेचे कपडे वापरणे. त्याचसोबत प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेल्या पाण्यात न पोहोणे आणि ते पाणी न वापरणे यांनी संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो.

due to flood waters now threat of leptospirosis increased know symptoms and care that is essential


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to flood waters now threat of leptospirosis increased know symptoms and care that is essential