शहरातील विकासकामांचा फटका ? लॉकडाऊननंतर पावसाने मुंबईकरांना रडवले 

सुमित बागुल
Thursday, 24 September 2020

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यावरील मॅनहोल्स उघडले जातात. मात्र, त्यामुळे रस्तावरील कचरा पंपिंगस्टेशनमध्ये अडकतो.

मुंबई  : लॉकडाऊननंतर पावसाने नागरीकांना चांगलंच रडवलंय. अनेक नागरिकांच्या   घरात पावसाचं पाणी शिरल्याने लहान मोठे दुकानदार, चाळीतील घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मुंबईतील अनेक भागात दिवसभर संपुर्ण संसार पाण्यावर तरंगत होते. दक्षिण मुंबईतील पाणी न साचणाऱ्या गोल देऊळ, वरळी सी फेस, मुंबई सेंट्रल या भागातही पाणी साचले होते. वरळी सीफेस येथे कोस्टल रोडचे काम सुरु आहे. तर मुंबई सेंट्रल येथे मेट्रोचे काम सुरु आहे. नायर रुग्णालयातही पाणी साचले होते. महालक्ष्मी पंपिंग स्टेशनमुळे नाना चौक येथे पाणी साचण्याचे प्रमाणकमी झाले होते. मात्र, तेथेही आज पाणी साचले होते.

खरंतर मंगळवार रात्री पासून मुंबईत पावसाचा जाेर वाढला होता, मध्यरात्री पासून अनेक भागात पाणी साचू लागले. नंतर काल पहाटेपासून घरं आणि दुकानात पाणी साचल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले. कोविडच्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक कुटूंबाचे आर्थिक गणित विस्कटले आहे. त्यातच पावसामुळे अनेक संसार आज पाण्यावर अक्षरशा तरंगत होते. हिंदमाता, दादर टिटी या नेहमीच्या भागात पाणी साचले होते. त्याचबरोबर कुर्लाा क्रांतीनगर, शिव, बोरीवली, गोरेगाव, वांद्रे, मुलूंड तसेच अनेक भागात पाणी साचल्याने लाखोो घरांचे आणि लहान मोठ्या व्यापार्यांचे नुकसान झाले होते.

महत्त्वाची बातमी : तारीख होती २३ सप्टेंबर १९८१; तब्बल ३९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला झालेला धुवाधार तुफानी पाऊस

विज पुरवठा खंडीत 

पाणी साचल्याने मुंबईतील अनेक भागांमधील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता. चिंचपोकळी येथे विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता असे स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी सांगितले. या परीसरात पावसाचे पाणी जास्त काळ साचून राहात नाही.  मात्र,काल परीस्थीती वेगळे होती. विजपुरवठा खंडीत असल्याने पिण्याचे पाणीही मिळण्यात अडचणी झाल्या होत्या.

मॅनहोल्स उघडल्याचा परीणाम 

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यावरील मॅनहोल्स उघडले जातात. मात्र, त्यामुळे रस्तावरील कचरा पंपिंगस्टेशनमध्ये अडकतो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

due to future development plans mumbikar are facing water logging is question asked by citizens

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to future development plans mumbikar are facing water logging is question asked by citizens