'कायद्याच्या आग्रहामुळे बदल घडेल'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई -  युवाशक्ती ही देशातील सर्वांत मोठी शक्ती आहे. या शक्तीने स्वतःसह इतरांनाही कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी आग्रह धरल्यास देशात मोठा बदल घडेल, असा विश्‍वास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी व्यक्त केला. यंग इन्स्पिरेशन नेटवर्क (यिन) कार्यशाळेचा समारोप सोमवारी (ता. २८) न्यायमूर्ती कोदे यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.

रोजच्या जगण्यासाठी कायदा किती महत्त्वाचा आहे. वैयक्तिक आणि देशाच्या विकासात कायद्याला किती महत्त्व आहे, याची जाणीव न्यायमूर्ती कोदे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. काही लोक कायदा मोडण्याची भाषा बोलत असले तरी कायदा मोडणे म्हणजे स्वतःचे आणि पर्यायाने देशाचे नुकसान करण्यासारखेच आहे. कायद्यावर श्रद्धा ठेवा. प्रत्येक व्यक्तीने कायद्याचा आग्रह धरलाच पाहिजे. स्वतः कायद्याचे पालन केले तरच इतरांनाही कायद्यासाठी आग्रह करू शकतो. कायद्याचा आदर आणि अंमलबजावणी झाली तरच देशात मोठा बदल घडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

विधिमंडळात कायदे विधेयक मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होते. ते मंजूर होण्यापूर्वी त्यावर सखोल विचारविनिमय होतो. मंजुरीनंतर त्यात उणिवा राहण्याची शक्‍यता असते. चूक झाली म्हणून बदल करूच नये, असे म्हणता येणार नाही. कायद्याच्या मंजुरीनंतही त्यात सुधारणा करता येऊ शकते. त्यामुळे बदल स्वीकारला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. प्रत्येक क्षणाचा सुदुपयोग करावा, असा सल्ला त्यांनी दिला. व्यक्तिविकास आणि राष्ट्रविकास म्हणजेच युवाशक्तीचा विकास आहे. राष्ट्राला पुढे न्यायचे असेल, तर युवाशक्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत मांडतानाच त्यांनी, जगात माझा देश श्रेष्ठ म्हणून चालणार नाही. युवाशक्तीने त्यासाठी सकारात्मक योगदान आणि कायद्याचा आग्रह धरणे आवश्‍यक आहे, असे मतही व्यक्त केले. 

Web Title: Due to the insistence of the law will change