कर्जत-खोपोली मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

कर्जत-खोपोली मार्गावरील पळसदरी ते खोपोली दरम्यान असलेल्या पुलांची दुरुस्ती करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
 

नेरळ, ता. 19 (बातमीदार) : कर्जत-खोपोली मार्गावरील पळसदरी ते खोपोली दरम्यान असलेल्या पुलांची दुरुस्ती करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पुलांचा पाया मजबूत करण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यासह इतर कामे रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस 4 तास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला असून, त्या काळात या मार्गावर धावणाऱ्या उपनगरी लोकलची वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.

ऐन दुपारच्या वेळी कर्जत-खोपोली दरम्यान उपनगरी लोकलची वाहतूक स्थगित असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. आजही मेगाब्लॉक असल्याने खोपोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. 
 

Web Title: due to karajat khopoli railway mega block paseengers are in problem