निगा न राखल्याने अनेक पुनर्रोपण केलेली झाडे दगावली

गजानन चव्हाण
शनिवार, 8 जून 2019

खारघर (बातमीदार) : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे दगावल्याने वृक्षप्रेमी मध्ये नाराजी पसरली आहे. 

खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे दगावल्याने वृक्षप्रेमी मध्ये नाराजी पसरली आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरचे ओवळे, वाघिवली वाडा, वाघिवली, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे , वडघर, वहाळ , कुंडे वहाळ गावात आणि परिसरातील जमिनीवर जवळपास साडे तीन हजाराहून अधिक झाडे  होती.मिळालेल्या माहितीनुसार 2470     झाडा पैकी एकशे सत्तर  झाडे सेंट्रल पार्क परिसर तर उर्वरित  तळोजा कारागृह शेजारील डोंगराच्या पायथ्याशी .पुनर्रोपण करण्यात आले होते. लावलेल्या झाडांचे निगा राखण्यासाठी दोन एजन्सीची नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यातील एका एजन्सीने लावलेल्या झाडांची योग्य प्रकारे निगा न केल्याने मोठ्या प्रमाणात झाडे दगावल्याची दिसून येत असल्यामुळे वृक्षप्रेमी मध्ये नाराजी पसरली आहे. 

विमानतळ प्रकल्पात किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. या विषयी माहिती घेण्यासाठी सिडकोच्या पर्यावरण, आणि विमानतळ विभागातील अभियांत्रिकी विभागात विचारणा केली असता. एकमेकांकडे बोट दाखवत माहिती देण्यास नकार दिले. यावरून सिडकोचे अधिकारी पर्यावरण विषयी किती उदासीन आहे हे दिसून येते. 

म्हणून झाडे दगावली
मिळालेल्या माहितीनुसार झाडांचे पुनर्रोपण करताना झाड बुंध्यापासून अलगद उखडून आणून खोल खड्डा खोदून पुनर्रोपण करणे आवश्यक होते. मात्र काही ठिकाणी दोन ते अडीच फूट खोल खड्डा केल्याचे दिसून येते. तर अनेक झाडांची कापणी  करून लावण्यात आल्याने झाडे दगावली असावी अशीही चर्चा सुरू आहे.

''लावलेल्या झाडांची योग्य प्रकारे पाणी देवून जोपासना करणे आवश्यक होते.पण तसे दिसून येत नाही.अनेक झाडे दगावली आहे.''
- सुधीर पटेल,वृक्षप्रेमी

''किती झाडांचे पुनररोपन करण्यात आले या विषयी विषयी विमानतळ विभागातून अहवाल प्राप्त झाले नाही.''
- गीता सावंत उद्यान अधिकारी, सिडको

''झाडे पुनररोपन विषयी अधिक प्राप्त झाल्यावरच माहिती देता येईल.''
- प्रिया रतांबे जण संपर्क अधिकारी सिडको.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lack of maintenance, many re-transplanted plants have been damaged