लॉकडाऊनमुळे इंटरनेट सेवा मंदावली; तक्रारींत झालीये तिपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरीच थांबले आहेत. त्यामुळे घरातून कार्यालयातील काम करणे आणि विरंगुळा म्हणून इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम इंटरनेट सेवेच्या वेगावर झाला आहे. ठाणे जिल्ह्यात याबाबतच्या तक्रारींमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. 

ठाणे : लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरीच थांबले आहेत. त्यामुळे घरातून कार्यालयातील काम करणे आणि विरंगुळा म्हणून इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम इंटरनेट सेवेच्या वेगावर झाला आहे. ठाणे जिल्ह्यात याबाबतच्या तक्रारींमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. 

ही बातमी वाचली का? असा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत- राज ठाकरे

सध्या जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नोकरदार, व्यवसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी अधिक वेळ घरात आहेत. ते विविध कामांसाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनमुळे इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा मनुष्यबळ अपुरा आहे, असे समजते. त्यामुळे दुरुस्तीची कामे रखडली आहे. सेवा वितरकांनाही या वाढत्या तक्रारींची दखल घेणे अशक्‍य झाले आहे. लॉकडाऊन अगोदार दिवसाला 40 ते 50 तक्रारी येत होत्या. त्या आता 150 पेक्षा अधिक असल्याचे इंटरनेट सेवा व्यावसायिक साई चौधरी यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांसाठी संघही सरसावला! दोन हजार कुटूंबांना शिधा वाटप 

इंटरनेट सेवा मंदावली आहे. ही समस्या सध्या जगभर आहे. ठाणे जिल्ह्यालाही याचा फटका बसला आहे. तक्रारींमध्ये वाढ झाली असली तरी सध्या यावर काहीच उपाय नाही. 
- इनायत इनामदार, इंटरनेट जाणकार 

ही बातमी वाचली का? ते म्हणतात, मोदीजी... असे केल्यास देश अंधारात जाईल! 

कार्यालयीन कामकाजासह जगभराच्या बातम्यांचा मागोवा घेण्यासाठी नागरिक मोबाईल, दूरचित्र वाहिन्यांचा उपयोग करत आहेत. त्यासाठी इंटरनेटचा उपयोग होत आहे. मात्र, वेग मंदावल्याने अधिक वेळ वाया जात आहे. घरातून काम करताना कार्यालयातील कामेही खोळंबतात. 
- अरुण तिवारी, नोकरदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to Lockdown slows down internet service in thane

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: