पावसामुळे रबाळे टी जंक्‍शनजवळ वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी जंक्‍शनजवळ पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने व खड्डे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक कोंडी होऊन त्याचा रुग्णवाहिकांनाही फटका बसत आहे.

मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी जंक्‍शनजवळ पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने व खड्डे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक कोंडी होऊन त्याचा रुग्णवाहिकांनाही फटका बसत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रबाळे टी जंक्‍शनजवळ रस्त्यांना पावसामुळे खड्डे पडले आहेत, तर या सखल भागात संततधार सुरू राहिल्यास गुडघाभर पाणी साचत आहे. या पाण्यात वाहनेही बंद होत आहेत. त्यामुळे रबाळे टी जंक्‍शनपासून घणसोली रेल्वेस्थानकापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. कोंडीत रुग्णवाहिका अडकण्याचे प्रकारही घडत आहेत. वाहतूक कोंडीत काही बेशिस्त वाहनचालकांकडून रस्ताही मोकळा करून देण्यात येत नसल्याने नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका सायरन वाजवत असतानाही चालक वाट मोकळी करून देत नाहीत. अशा बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करावी. 
- जागृती तिखे, प्रवासी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the rains, traffic near Rabale Tea Junction