सीएनजी वाहनचालकांनो सावधान !

सीएनजी वाहनचालकांनो सावधान !

मुंबई : ओएनजीसीच्या उरण ते वडाळा या गॅस पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी सीएनजीचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शुक्रवारी संध्याकाळी सीएनजीचे ६ पंप बंद पडले. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या ऑटो, टॅक्‍सी, बेस्टच्या बसेस आणि इतर खासगी वाहनांची वाहतूक शनिवारी ठप्प होणार आहे. दुरुस्ती होईपर्यंत मुंबईकरांचे हाल होण्याची शक्‍यता आहे.

अशा स्थितीत सीएनजी गॅस पुरवणारे पंप बंद पडल्याने सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची सेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असल्याचे ओएनजीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत सीएनजीवर चालणारी वाहतूक विस्कळित होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत शहरातील 6 सीएनजी पंप बंद पडले. या परिस्थितीमुळे शहरात एकूण १३३ सीएनजी पंपावरसुद्धा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. ओएनजीसीच्या उरण येथील प्रकल्पामधून महानगरला गॅस पुरविण्यात येतो; मात्र अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा अतिशय कमी दाबाने सुरू आहे. 

घरगुती वापरासाठी पुरविण्यात येणाऱ्या पीएनजीची सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महानगर गॅस लिमिटेड करत असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. महानगरचा पीएनजी गॅस वापरणारे सुमारे १२ लाख ग्राहक आहेत; तर सीएनजीवर चालणारी वाहने शहरात ७ लाखांच्या घरात आहेत. सीएनजीच्या पंपाच्या तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत वाहनांना सीएनजी मिळणार नसल्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com