Monsoon DiseasesESakal
मुंबई
Mumbai News: मुंबईत पावसाची उघडझाप, साथीचे आजार वाढले; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Monsoon Diseases: पावसाळ्यातील अनियमित वातावरणामुळे मुंबईत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : पावसाळ्यातील अनियमित वातावरणामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे मुंबईत डेंग्यू, गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाणी, अन्न, डास-किटकांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील बदल या कारणांमुळे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णालये तसेच खासगी दवाखान्यांमध्ये ताप, अंगदुखी, पोटदुखी आणि श्वसनाच्या तक्रारींसाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.