

Mumbai Water Supply cut
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो ७अ' प्रकल्पासाठी २,४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आला आहे. वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाईल. त्यामुळे मंगळवार, २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स , कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. तसेच अन्य काही भागातील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.