उबरची तांत्रिक अडचणींमुळे 'टॅक्सी'सेवा लांबली

due to unforeseen operational issues the uber boat pilot in mumbai
due to unforeseen operational issues the uber boat pilot in mumbai

मुंबईः उबरची तांत्रिक अडचणींमुळे आज (शुक्रवार) सुरू होणारी उबर 'टॅक्सी'सेवा लांबली आहे. उबर इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. मात्र, ही सेवा नेमकी कधी सुरू होईल, याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही. जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या सहकार्याने उबरने एक फेब्रुवारीपासून 'टॅक्सी'सेवा देण्याची घोषणा केली होती.

गेटवे ऑफ इंडिया, घारापुरी, मांडवा या मार्गांवर उबर बोट चालवण्यात येणार होती. प्रवासाच्या किमान 15 मिनिटे आधी बोटीचे तिकीट आरक्षित करता येणार होते. मुंबई व उपनगरांत रेल्वे, बस, टॅक्‍सी, रिक्षावर अवलंबून असलेल्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत उबरने समुद्रमार्गे "टॅक्‍सी' सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना स्पीड बोटीतून काही मिनिटांतच मांडवा, अलिबाग, घारापुरीला जाणे शक्‍य होईल. मुंबईकरांना मोबाईलवरून एका क्‍लिकवर या प्रवासाचे तिकीट मिळू शकणार आहे. गेटवे ऑफ इंडियावरून आज पासून उबर बोट सेवा सुरू होणार होती. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासाचा एक नवा पर्याय मिळणार आहे. त्यानंतर अलिबाग आणि नवी मुंबईपर्यंत स्पीड बोट सुरू केली जाईल, असे उबरतर्फे सांगण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सेवा लांबली आहे.

समुद्री टॅक्‍सी
उबरच्या समुद्री टॅक्‍सी सेवेत 10 आसनी आणि सहा ते आठ आसनी अशा दोन प्रकारच्या स्पीड बोटी असणार आहेत. सुरुवातीला गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा बोट सेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com