डॉक्‍टरांच्या सतर्कतेने चोरट्याला रंगेहाथ अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरी केली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परबवाडी येथील ग्रीष्मा सोसायटीत नेत्रतज्ज्ञ डॉ. गाडगीळ, पत्नी व वडिलांसोबत राहतात. 21 जूनला डॉ. गाडगीळ दाम्पत्य रात्री 8.30 वाजता घरी आले.

ठाणे : ठाण्यातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. उदय गाडगीळ यांच्या सतर्कतेमुळे घरात शिरलेल्या मोबाईल चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विशाल अवघडे (23) रा. डिसोझा वाडी, वागळे इस्टेट असे या चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून रोख रकमेसह दोन मोबाईल असा सुमारे 20 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 21 जूनच्या रात्री डॉ. गाडगीळ यांच्या वागळे इस्टेट, परबवाडी येथील घरामध्ये ही घटना घडली. 

चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरी केली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परबवाडी येथील ग्रीष्मा सोसायटीत नेत्रतज्ज्ञ डॉ. गाडगीळ, पत्नी व वडिलांसोबत राहतात. 21 जूनला डॉ. गाडगीळ दाम्पत्य रात्री 8.30 वाजता घरी आले. तेव्हा त्यांच्या वडिलांचे दोन्ही मोबाईल आणि रोख रक्‍कम घरातून गायब असल्याचे दिसून आल्याने त्यांनी नातेवाइकांकडे वडिलांच्या मोबाईलबाबत विचारणा केली. 

दरम्यान, 10.15 वाजता अचानक बेडरूमचा दरवाजा ढकलल्याची चाहूल त्यांना लागली. घरात कुणीतरी शिरल्याची खात्री पटल्यानंतर डॉ. गाडगीळ यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि शेजाऱ्यांनाही सतर्क केले. त्यानंतर पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. 

Web Title: Due to the vigilance of the doctor one arrested