esakal | दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अधिक

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी देशाच्या तुलनेने मुंबई अधिक दिवसांचा आहे; तर मृत्यूदरही जवळपास निम्म्यावर आला आहे. महापालिकेने 27 एप्रिलपर्यंतची कोरोनारुग्णांची आकडेवारी केंद्र सरकारच्या समितीला सुपूर्द केली होती. त्या आकडेवारीवरुन केंद्रीय पथकाने हा निष्कर्ष काढल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 

दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी देशाच्या तुलनेने मुंबई अधिक दिवसांचा आहे; तर मृत्यूदरही जवळपास निम्म्यावर आला आहे. महापालिकेने 27 एप्रिलपर्यंतची कोरोनारुग्णांची आकडेवारी केंद्र सरकारच्या समितीला सुपूर्द केली होती. त्या आकडेवारीवरुन केंद्रीय पथकाने हा निष्कर्ष काढल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत 17 ते 27 एप्रिलदरम्यान रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 10 दिवसांवर आले आहे. देश पातळीवर हे प्रमाण 9.5 दिवसांचे; तर राज्यात 8.9 दिवसांचे आहे. या पुर्वी मुंबईत हे प्रमाण 8.3 दिवसांवर होते. मुंबईतील मृत्यूदरातही घट झाली आहे. पुर्वी 6.3 टक्क्यांवर असणारे हे प्रमाण 16 ते 26 एप्रिलदरम्यान 3.9 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. राज्यात हे प्रमाण 4.3 टक्के आहे. राज्य सरकारने मुंबईतील मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समितीही नियुक्त केली होती.

Big Breaking - 'लीलावती'मधील प्लाझ्मा थेरपी यशस्वी, राजेश टोपे यांची माहिती

पालिकेची तत्परता 
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण आढळताच पालिकेने रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली.  पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळला. त्यानंतर 26 एप्रिलपर्यंत तब्बल 1 लाख 29 हजार 477 रूग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आले. यातील 21 हजार 52 लोक हाय रिस्क गटातील  होते.  यातून 1 हजार 647 रूग्ण शोधता आले.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
चाचण्यांमध्ये मुंबई अव्वल
मुंबईत आतापर्यंत तब्बल 66 हजार चाचण्या करण्यात आल्या. म्हणजेच 10 लाख लोकांमागे 5  हजार 71 चाचण्या करण्यात आल्या. तामिळनाडू, राजस्थान, नवी दिल्ली, केरळ येथे हेच प्रमाण अनुक्रमे 2 हजार 624, 1 हजार 220, 794 आणि 684 असे आहे.