Dombivli Ralway Station News : डोंबिवली स्टेशन आता तुंबणार नाही,नाल्याचे बुजलेले प्रवाह झाले खुले

रस्त्यांचे व फुटपाथचे काम करते वेळी नैसर्गिक नाल्याचे प्रवाह बंद झाल्याने याठिकाणी पाणी तुंबत असे.
Dombivli Ralway Station
Dombivli Ralway Stationsakal

डोंबिवली - तासभर पाऊस पडला नाही की डोंबिवली स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचून दुकानांमध्येही हे पावसाचे पाणी शिरत असे. येथील रस्त्यांचे व फुटपाथचे काम करते वेळी नैसर्गिक नाल्याचे प्रवाह बंद झाल्याने याठिकाणी पाणी तुंबत असे.

Dombivli Ralway Station
Mumbai News: धक्कादायक! बोरीवलीतील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये कुजलल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

येथील बांधकाम तोडत नाल्याचे प्रवाह खुले करण्यात आले असल्याने या परिसरात पाणी तुंबण्याची समस्या कमी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात मुसळधार पावसामुळे नेहमी पाणी साचत आहे , ही समस्या लक्षात घेता बुधवारी माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत स्टेशन परिसराची पाहणी केली.

Dombivli Ralway Station
Jaipur Mumbai Train Firing: RPF कॉन्स्टेबलने गोळ्या झाडलेले 3 प्रवासी कोण होते? संपूर्ण माहिती समोर

स्टेशन परिसरात नाल्यात पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने या परिसरात थोडासा पाऊस झाला तरी पाणी साचत होते. ही बाब पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या लक्षात आणून देण्यात आली. पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही समस्या तातडीने सोडविण्याकरीता ठोस पावले उचलण्यास सांगितले.

त्यानुसार फुटपाथ लगत करण्यात आलेले रस्त्याचे पेव्हर ब्लॉक काढण्यात आले आहेत. गटाराचे बुजविले गेलेले प्रवाह यावेळी मोकळे करण्यात आले आहेत. यामुळे आता या परिसरात पाणी साचण्याची प्रक्रीया कमी होईल.

तसेच या ठिकाणी रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम करते वेळी रेल्वे नाल्याचा प्रवाह बंद झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत आहे. त्यावरही लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी दिपेश यांनी सांगितले.

नाल्याचे प्रवाह खुले करण्यात आल्याने आता पाणी तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावणार नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com