esakal | शालेय 'फी'बाबत वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय, दिल्यात 'या' सूचना...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शिक्षण मंत्र्यांच्या शाळा व्यवस्थापनांना सूचना 

शालेय 'फी'बाबत वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय, दिल्यात 'या' सूचना...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत मुलांच्या शैक्षणिक शुल्कासाठी शाळा व्यवस्थापनाने पालकांकडे तगादा लावू नये, अशी सुचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 

लॉकडाऊनच्या कालावधीत शुल्क वसुलीबाबत शाळांनी सहानुभूतीने विचार करावा, अशा आशयाचे परिपत्रक 30 मार्च रोजी काढले असले तरीही काही शाळा पालकांकडे शैक्षणिक शुल्कासाठी विचारणा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंत्री गायकवाड यांनी या सूचना केल्या आहेत. 

हेही वाचलत का...आणि मजुरांनी धूम ठोकली 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन कालावधीत शालेय शुल्क भरण्यास सूट देण्यात आलीआहे. राज्यातील सर्व बोर्डाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी 2019-20आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शालेय शुल्क वसुलीची सक्ती करू नये, असे आदेश देणारे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

 हेही वाचलत का...शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस धोक्‍याचे 


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष आणि आगामी शैक्षणिक वर्षाचृ शुल्क जमा करण्याचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी अनेक पालकांनी राज्य सरकारकडे केली होती. त्या पार्श्वभमीवर राज्य सरकारने हे परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोणत्याही शाळेने चालू आणि आगामी शैक्षणिक वर्षाचे शुल्क जमा करण्याची सक्ती पालकांना करू नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे. 

education minister varsha gaikwad on fees of school students read full story

loading image
go to top