esakal | Lockdown2.0 : आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown2.0 : आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

औषध, दुध विक्रीशिवाय सर्व व्यवहार राहणार बंद...

Lockdown2.0 : आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

sakal_logo
By
अनिल पाटील

खोपोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात दुसऱ्या टप्यातील लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे; मात्र मोठया प्रमाणावर नागरिक शहरातील बाजारपेठ, विविध रस्ते आणि रहिवासी भागात विनाकारण फिरत आहेत. यावर उपाय म्हणून खोपोलीत शनिवार (ता. १८) पासून तीन दिवस कडक जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. 

या तीन दिवसांत औषध व दुधविक्री सोडून अन्य सर्व दुकाने व आस्थापने शंभर टक्के बंद राहणार असून, रस्त्यावर एकही मनुष्य न दिसण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
खोपोली व परिसरात कोरोनाचा प्रवेश रोखण्यासाठी व कोरोना विषाणू फैलावाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसीय जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे.

मोठी बातमी - कोरोना पाठोपाठ आता शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस आहेत अधिक धोक्याचे...

लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यातील दोन दिवसांच्या जनता कर्फ्युप्रमाणे हा कर्फ्यूही यशस्वी होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. खोपोली व शीळफाटा व्यापारी असोसिएशन, भाजीपाला विक्री संघ, शहरातील कार्यरत सामाजिक संस्था, सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधी, नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

या बाबत खोपोली नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षिरसागर यांचेही मार्गदर्शन घेण्यात येऊन तीन दिवस खोपोली व परिसर पूर्ण बंदची माहिती या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच आपत्कालीन स्थितीत मदतीची तयारी व नियोजन प्रभावी करण्याची विनंती करण्यात आली असून, या बंदला अधिकारी वर्गाकडूनही संमती मिळाली आहे.

मोठी बातमी -  जरा विचार करा, ते स्थलांतरित निघून गेले तर मुंबईचे काय ?

खोपोलीत तीन दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा दर्शविला असून , नगरपालिका क्षेत्रात संपूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. - सुमन औसरमल, नगराध्यक्षा खोपोली

खोपोलीतील कोरोनाचा संभाव्य प्रवेश  रोखण्यासाठी हे एक सकारात्मक पाहुल आहे. यात सर्व व्यापारी वर्ग स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. - राजेंद्र फक्के, जेष्ठ सल्लागार व्यापारी संघटना खोपोली- शीळफाटा

during extended lockdown in india khopoli decides to have three days janata curfew

loading image