कर्जत-भिवपुरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे, वाहतूक दोन तास विस्कळीत

railway.
railway.

नेरळ - ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक कर्जत-भिवपुरी रोड दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने विस्कळीत झाली. गर्दीच्या वेळी उपनगरीय रेल्वे विस्कळीत झाल्याने चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान, त्या मार्गाने उपनगरीय लोकल सेवा सुरू केली असून, या दरम्यानच्या मुंबईकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस पनवेल मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील कर्जत-भिवपुरी रोड या दरम्यान आज खांब क्रमांक 97/0 या ठिकाणी सकाळी अप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्याचे सावरगाव-वांजळे दरम्यान असलेल्या बी केबिन मधील पॉइंट्समनच्या लक्षात आले. रुळाला तडे गेल्याची माहिती सिंहगड एक्सप्रेस कर्जत स्थानकातून मुंबईकडे रवाना झाल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे त्या रेल्वे कामगाराने त्याबाबत माहिती कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये दिली. परिणामी मुंबई कडे अप मार्गाने 8 वाजून 27 मिनिटांनी जाणारी जलद लोकल कर्जत स्थानकात थांबविण्यात आली. रेल्वे रुळाला तडे गेले आहेत त्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहचल्यानंतर पुढील सव्वा तासात तडे गेलेला रूळ कापून त्या ठिकाणी तडे गेलेला भाग कापून त्या ठिकाणी नवीन भाग बसविण्यात आले. आणि त्यानंतर 9 वाजून 50 मिनिटांनी कर्जत येथून पहिली उपनगरीय लोकल मुंबईकडे निघाली. मात्र या काळात खोपोली येथून मुंबईकडे जाणारी 9.08 मिनिटांनी उपनगरीय लोकल आणि 9 वाजून 45 ची मुंबई लोकल थांबवून ठेवण्यात आली होती. मात्र साडे आठ पासून दहा वाजेपर्यंत मुंबई येथे जाण्यासाठी उपनगरीय लोकल उपलब्ध नसल्याने कामगार वर्गाचे तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.

या कालावधीत मुंबई येथे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या या पनवेल मार्गे सोडण्यात आल्या. त्यात हैद्राबाद एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेस यांचा समावेश असून प्रगती एक्सप्रेस याच मार्गे दररोज मुंबई येथे जात असते. 9वाजून 50 मिनिटांनी कर्जत येथून पहिली उपनगरीय लोकल मेन लाईनने सोडण्यात आली असून, डाऊन मार्गावरील खांब क्रमांक 97/0या ठिकाणी तडे गेलेले पूर्ण रूळ बदलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे उपनगरीय लोकल वगळता कोणत्याही मेल एक्सप्रेस या डाऊन मार्गाने सोडण्यात येणार नाहीत असे कर्जत रेल्वे कार्यलयातून कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com