अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

राज्यात कोरोनाची प्रार्दुभाव वाढला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे.

मुंबई- राज्यात कोरोनाची प्रार्दुभाव वाढला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यातच सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं सर्वांत कडक नियम आहे. त्यातच आता सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याची बातमी समोर आली आहे. घाटकोपरमध्ये चक्क लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत समोसा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर कारवाई केली आहे. 

Big News - कोरोनावर नियंत्रणासाठी नवी उपाययोजना; प्रत्येक प्रभागात 100 खाटांचे रुग्णालय

घाटकोपर येथील पंतनगर भागात एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा गुन्हा पंतनगर पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्ष आणि सदस्यांना अटक केली आहे. नंतर त्यांची जामिनांवर सुटकाही करण्यात आली. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या सोसायटीमध्ये भाजपचे माजी मंत्री यांचंही घर आहे.  

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, घाटकोपर (पूर्व) येथील वल्लभ बाग लेन येथील पॉश हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आणि सदस्यावर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन आणि समोसा पार्टी आयोजित करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही समोसा पार्टी 15 मे किंवा 16 मे रोजी आयोजित केली होती. यावेळी जोरजोरात गाणीही लावण्यात आली होती. नंतर समोसा आणि इतर स्नॅक्सचं वाटप करण्यात आलं, अशी प्राथमिक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. इतकंच नाही तर, रहिवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघनच केलं नाहीतर सोसायटीच्या बाहेर एकत्रित उभे राहून गप्पा सुद्धा मारल्या, असं पोलिसांनी सांगितलं. 

Lockdown : कधी कोरडा भात, तर कधी नुसती चपाती..., घर कामगार महिलांचं जगणं मुश्किल

पंत नगर पोलिसांना 18 मे रोजी या पार्टीचे फोटो मिळाले आणि त्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आला. त्याच दिवशी दोन जणांना अटक करण्यात आली. या दोघांना पोलिस ठाण्यातून जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आम्ही आरोपींना आयपीसी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक केली आहे. त्यांना जामीनही मिळाला असल्याची माहिती पंतनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली. पोलिसांनी आरोपींची आणखी माहिती किंवा नावं सांगण्यास नकार दिला.

during lockdown society in mumbai hosted samosa party


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: during lockdown society in mumbai hosted samosa party