कोरोनावर नियंत्रणासाठी नवी उपाययोजना; प्रत्येक प्रभागात 100 खाटांचे रुग्णालय

covid care centre
covid care centre

मुंबई : महापालिकेने 24 प्रशासकीय प्रभागात प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 10 खाटा अतिदक्षता विभागाच्या असतील. या निर्णयामुळे 2 हजार 400 खाटा उपलब्ध होणार असून 240 आयसीयू बेड्स असतील. 

मुंबईत सध्या कोव्हिडची प्रखर लक्षण असलेल्या रुग्णांसाठी सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात 3 हजार 690 खाटा उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी वांद्रे कुर्ला संकुल येथे 1 हजार खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे; तर लक्षण नसलेल्या रुग्णांसाठी विविध क्लब, सभागृह, शाळांमध्ये 30 हजार खाटांची सोय करण्यात आली आहे; मात्र रुग्णांची संख्या वाढतच असल्याने खाटा अपुऱ्या पडत आहेत. 

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे नुकतीच पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रुग्णालयांचा आढावा घेतला. त्यामध्ये प्रत्येक विभागात 100 खाटांच्या रुग्णालयांची तयारी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. एका ठिकाणी 100 खाटा तयार होत नसतील तर 50 खाटांची दोन रुग्णालये तयार करण्याचाही शिफारसही आयुक्तांनी केली आहे. 

अधिकारांचा वापर करा!  
विभागातील नर्सिंग होम्स रुग्णालये जागा उपलब्ध करुन देत नसतील; तर अधिकारांचा वापर करुन रुग्णालय ताब्यात घ्या, असेही आयुक्त इक्बाल चहल यांनी विभागातील सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले. देशात सध्या साथ नियंत्रण कायदा लागू असल्याने पालिकेला हे विशेष अधिकार मिळाले आहेत.

... तर रुग्णालयांवर कारवाई 
खासगी डॉक्टरांच्या मागणीनूसार महापालिकेने खासगी डॉक्टरांना पीपीई किट उपलब्ध करुन दिले आहे. हे किट मिळाल्यानंतरही दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम्स सुरु न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.संबंधितांवर गुन्हे नोंदवून त्यांची परवाने रद्द करण्याची प्रक्रीया सुरु करावी, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com