डोक्यावर अक्षता पडण्याआधी आले पोलिस आणि वऱ्हाड निघालं पोलिस स्टेशनला

डोक्यावर अक्षता पडण्याआधी आले पोलिस आणि वऱ्हाड निघालं पोलिस स्टेशनला

उल्हासनगर - संचारबंदी तसेच लॉकडाऊन जाहिर केल्यापासून सर्व लग्नांचे हॉल-सभागृह बंद करण्यात आलेली आहेत.असे असताना मैदानात मंडप टाकून लग्न थाटण्याचा प्रकार वधू-वरा सह वऱ्हाडिंच्या अंगलट आल्याचा प्रकार उल्हासनगरात घडला आहे.यासर्व मंडळींची पोलिसांच्या जीपमधून पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढण्यात आली आहे. त्यांना होम क्वारंटाईनची शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी सकाळ शी बोलताना दिली.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मध्ये हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दसरा मैदान आहे.या मैदानात लग्न सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांना मिळताच त्यांनी पोलिसांना पाठवून लग्न थांबवले. वधू-वरा सह जवळपास 25 ते वऱ्हाडिंना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

एकतर सर्व लग्नाचे हॉल बंद आहेत. दुसरीकडे चारपाच च्या वर नागरिकांनी एकत्र फिरू नये.सोशल डिस्टनिंग ठेवावे असे असताना या लग्नात 25 ते 30 जण जमले होते.सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असताना एव्हड्या मोठ्या संख्येने वऱ्हाडी जमल्याने त्यात कुणाला कोरोनाची संशयित लक्षणे असल्यास त्याची लागण इतरांना देखील होऊ शकते.त्यामुळे वधू-वरा सह सर्व वऱ्हाडिंना शिक्षा म्हणून त्यांना त्यांच्याच घरात होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.असे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी सांगितले.

during lockdown wedding event is conducted in ulhasnagar cops took action

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com