esakal | 'ती' मतदान करत होती आणि तेंव्हाच त्याने केला..
sakal

बोलून बातमी शोधा

'ती' मतदान करत होती; अन्‌ त्याने केला कोयत्याने वार..

केळवे येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवीगाळ करणाऱ्यास विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली.

'ती' मतदान करत होती आणि तेंव्हाच त्याने केला..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : केळवे येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवीगाळ करणाऱ्यास विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली. हितीशी वैभव पाटील (वय २८, रा. केळवे पूल नाका) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे; तर उमेश भोईर असे हल्लेखोराचे नाव असून केळवे पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हल्लेखोर आरोपी भोईर फरारी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ही बातमी वाचली का? 'अबब...!'  १ किलोचा एकच पेरू; विक्री जोरात

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी काही राजकीय पक्षांनी केळव्याच्या आदर्श विद्यामंदिर शाळेजवळ बूथ लावले होते. दरम्यान, हितीशा पाटील या दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी आपला मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बुथवर काही लोकांशी बोलत उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी उमेश भोईर याने बुथवर येत आपले नाव मतदान यादीत आहे का? याबाबत रितेश पाटील याच्याकडे विचारपूस करीत असताना त्याला हितीशी यांनी रोखले. यावरून आरोपी उमेश व हितीशी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. आरोपी उमेश शिवीगाळ करू लागल्यानंतर एका स्थानिक तरुणासह काही लोकांनी आरोपी उमेशला समजावून सांगून बाजूला केले.

ही बातमी वाचली का?  शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात..

त्यानंतर हितीशी आपल्या दुचाकीवरून शितलाई मंदिराजवळ रिक्षा स्टॅंडवर उभ्या असलेल्या आपल्या पतीला भेटायला गेल्या. दरम्यान, हितीशी या घडलेला प्रकार सांगत असताना आरोपी उमेश हातात कोयता घेऊन तेथे आला आणि त्याने कोयत्याने हितीशी यांच्यावर वार केले. या प्रकरणी हितीशी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोईर उमेशविरोधात केळवे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

During the voting man hit woman with sharp metal tool called Coyote in palghar

loading image