esakal | शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...

शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाची थकीत रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सांगितले. तसेच पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या लवकर नवीन योजना जाहीर केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाचा प्रारंभ राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या अभिभाषणास विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींसह विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.

धक्कादायक : वय २३ वर्ष, हेडफोन्सने घेतला जीव..

राज्यपाल यावेळी म्हणाले, राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, महिला व तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी शासन वचनबद्ध आहे. महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्या संबंधातील गुन्ह्यांबाबत त्वरित व कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्‍यक ती सुधारणा देखील केली जाईल. महाराष्ट्राच्या निर्मितीचे हे साठावे वर्ष असून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धाजली अर्पण करीत राज्यपाल म्हणाले, गेल्या 60 वर्षात कृषी, उद्योग, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती राज्याने केली आहे. या कामगिरीचा सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोठी बातमी : 'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद...

महाराष्ट्र, कर्नाटक संबंधात राज्याने दावा केलेल्या 865 गावात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे व विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याचा पुनरुच्चार राज्यपालांनी यावेळी केला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणांमध्ये राज्य शासन सातत्याने भूमिका मांडत राहील, अशी ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली.

शासनाने सुरु केलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तिला केवळ 10 रुपयांमध्ये चौरस आहार देण्यात येईल. बळीराजाला सहाय्य करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज माफ करण्यात येणार आहे. ही योजना कालबद्ध रीतीने राबविण्यात येणार असून पीक कर्जाची थकीत रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना तयार करण्यात येत असून त्यास अंतिम रुप देण्यात येत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या लवकर नवीन योजना जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

धक्कादायक ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''

युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी उपाययोजना करताना त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे राज्यपालांनी सांगितले. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथील आदीवासी विकास विभागाच्या प्रदेश निहाय विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने क्रीडा उत्कृष्टता केंद्र किंवा क्रीडा अकादमी निर्माण करण्यात येतील. त्यामध्ये आदीवासी युवकांमधील क्रीडा विषयक निपुणतेस चालना दिली जाईल, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यातील तीर्थस्थळांचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून अनेक भाविक शिर्डी येथे पदयात्रा करतात. या यात्रेकरुंसाठी सुविधा पुरविण्याकरीता पहिल्या टप्यात मुंबई ते शिर्डी या मार्गावर शौचालय, पिण्याचे पाणी यासारख्या मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील. ग्रामीण जनतेला लाभदायी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना देखील राबविण्यात येतील, असेही राज्यपालांनी सांगितले.

new policy for farmers who has more than two lack loan says maharashtra governor 

loading image