esakal | 'अबब...!' १ किलोचा एकच पेरू; विक्री जोरात
sakal

बोलून बातमी शोधा

अबब...! १ किलोचा एकच पेरू; विक्री जोरात

स्थानिक पेरूंबरोबर बाजारात बऱ्याच जाती आपल्याला पाहायला मिळतात. पण यातील एक पेरूची जात सध्या ग्राहकांना चांगलीच आकर्षित करत आहे. ती म्हणजे रायपूर जातीचा पेरू! या पेरुला हायब्रीड पेरू असे देखील म्हणतात. 

'अबब...!' १ किलोचा एकच पेरू; विक्री जोरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मूंबई : थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात पेरू दिसायला सुरुवात होते. स्थानिक पेरूंबरोबर बाजारात बऱ्याच जाती आपल्याला पाहायला मिळतात. पण यातील एक पेरूची जात सध्या ग्राहकांना चांगलीच आकर्षित करत आहे. ती म्हणजे रायपूर जातीचा पेरू! या पेरुला हायब्रीड पेरू असे देखील म्हणतात. 

ही बातमी वाचली का? हार्बर, ट्रान्सहार्बर मार्ग ठरतोय घातक; वाचा का ते...

रायपूर जातीचा पेरू दिसायला मोठा असून, त्याचा एक-दीड किलोचा आकार पाहून लोकही अचंबित होत आहेत. कमीत-कमी एक किलो वजन... बिया कमी आणि जास्त गर,.. असा हा ग्राहकांना भुरळ पाडणारा पेरू आहे. एपीएमसीतील फळविक्रेत्यांकडे हा पेरू सध्या विक्रीला आहे. हा पेरू केवळ आकर्षणाचा भाग राहिला नाही; तर त्याची विक्रीही जोरात सुरू आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद

रायपूर पेरूची मुख्य जात ही थायलंडमधील असून, चार वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये या पेरूची लागवड होण्यास सुरुवात झाली. आता हळूहळू महाराष्ट्रातील पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील या पेरूच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? बदलत्या हवामानाचा असाही परिणाम..

सध्या मध्य प्रदेशबरोबरच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून रायपूर जातीच्या पेरूच्या सुमारे 2 हजार पेट्या बाजारात दाखल होत आहेत. या पेरूला बाजारात चांगली मागणी आहे. 
- गिरीश वाघ, व्यापारी. 

loading image
go to top