‘डीवायएफआय’चे मोर्चेकरी शाळेत स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

चेंबूरमध्ये पोलिस छावणीचे स्वरूप

चेंबूर : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) यांच्या विरोधात आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (डीवायएफआय) वतीने उरण ते चैत्यभूमीपर्यंत काढण्यात अालेला मोर्चा मंगळवारी (ता. १८) रात्री उशिरा चेंबूर येथे आला. त्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना तेथील आदर्श विद्यालयात बुधवारी (ता. १९) सायंकाळपर्यंत स्थानबद्ध केले. त्यामुळे शाळेच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

शाहरुखची मुलगी सुहाना बद्दल करण जोहर म्हणतोय, "कृपया 'त्या' अफवा आता थांबवा..."

सीएए, एनआरसी, एनपीआर आदी निर्णय रद्द करा, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करू नका, बेरोजगारी हटवा, दर्जेदार शिक्षण द्या आदी मागण्यांसाठी डीवायएफआयने १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत उरण ते चैत्यभूमीपर्यंत ‘यूथ मार्च’ काढला. संघटनेचे २००० सदस्य-कार्यकर्ते चैत्यभूमीपर्यंत चालत जाऊन सभा घेणार होते, परंतु मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना आदर्श विद्यालयाजवळ अडवले. परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याचे कारण देत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळेतच कोंडून ठेवले. पोलिसांच्या कारवाईचा मोर्चेकऱ्यांनी तीव्र निषेध केला.

"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू असताना डहाणूचे माकप आमदार विनोद निकोले, अखिल भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष अशोक ढवळे आणि अन्य नेते घटनास्थळी येऊन आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी पोलिसांच्या कथित दडपशाहीचा निषेध केला. या दडपशाहीविरोधात विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवू असे त्यांनी सांगितले. चैत्यभूमीपर्यंत जाऊन सभा घेणारच, असा निर्धार डीवायएफआयच्या सरचिटणीस प्रीती शेखर व अन्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.  अखेर सायंकाळी ५ वाजल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना टेम्पो, ट्रक व व्हॅनमध्ये बसवून चैत्यभूमीपर्यंत नेले.

पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून चालत जाऊ नका असे सांगितले. आम्ही बेलापूरपर्यंत आल्यावर नोटीस देऊन मोर्चाला परवानगी नाकारली. इंग्रजांनी महात्मा गांधी यांना रोखले नव्हते. राज ठाकरे यांचा मोर्चा सरकार अडवत नाही; मग आमच्यावर सरकारची दडपशाही का?
- प्रीती शेखर,
राज्य सरचिटणीस, डीवायएफआय

The 'DYFI' front activist detained in the school


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 'DYFI' front activist detained in the school