शाहरुखची मुलगी सुहाना बद्दल करण जोहर म्हणतोय, "कृपया 'त्या' अफवा आता थांबवा..."

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

मुंबई : काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवेला अखेर करण जोहर याने अखेर उत्तर दिलं आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बिग बॉस १३मधील स्पर्धक असीम रियाज यांना घेऊन करण जोहर 'स्टुडन्ट्स ऑफ द इयर-३' चित्रपट करणार आहे अशा चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्या होत्या. मात्र या सगळ्यांना करण जोहर याने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय.

"आपण शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बिग बॉस १३ मधील स्पर्धक असीम रियाज यांना घेऊन करण जोहर 'स्टुडन्ट्स ऑफ द इयर-३' चित्रपट करणार आहोत अशा चर्चा आता कृपया करून थांबवा", असं आवाहन करण जोहर याने केलंय.

मोठी बातमी - "कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

बिगबॉसच्या ग्रँड फिनालेनंतर लगेचच 'स्टुडन्ट्स ऑफ द इयर-३' या चित्रपटात सुहाना खान आणि असीम रियाज काम करणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि त्याच कारण म्हणजे चित्रपट समीक्षक कमाल खान याने केलेलं ट्वीट. केआरके याने ट्वीटमधून सुहाना आणि असीम यांच्या एकमेकांसोबत काम करण्याची माहिती दिली होती. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं आता समोर आलं आहे.

काय ट्वीट केलं करण जोहरने:

Absolutely baseless stories making the rounds of SOTY3 !!!! My request to everyone publishing this fabrication is to kindly Stop! Please!

— Karan Johar (@karanjohar) February 18, 2020

'स्टुडन्ट्स ऑफ द इयर-३' याबाबत पसरवण्यात येणाऱ्या सर्व अफवा आहेत त्यामुळे हे माझे सर्वांना आवाहन आहे की अशा कहाण्या आणि चर्चा थांववाव्या". असं ट्वीट करण जोहरने केलंय.

मोठी बातमी -  पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.. कारण मुंबई पेटलीये !

करण जोहर आपल्या सिनेमांमद्धे केवळ स्टारकिड्सनाच संधी देतात असाही आरोप करण जोहर याच्यावर करण्यात आला होता. याबद्दल "कोणाचं नाव आणि आडनाव काय आहे या गोष्टिनी काहीही फरक पडत नाही, त्यांना तो रोल मिळण्यामागे त्यांची खूप वर्षांची मेहनत आणि साधना असते" असं करण जोहर याने म्हंटल आहे.  

karan johars tweet of launching suhana khan with big boss 13 winner in student of the year3

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karan johars tweet of launching suhana khan with big boss 13 winner in student of the year3