डहाणू, तलासरीला भूकंपाचे हादरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

तलासरी - डहाणू आणि तलासरी येथे शनिवारी (ता. 1) रात्री पुन्हा एकदा जमिनीला हादरे बसल्याने नागरिक धास्तावले. रात्री दीड वाजता एकामागोमाग एक तीन भूकंपाचे धक्के बसल्याने डहाणू आणि तलासरीतील नागरिकांची झोप उडाली. हा भूकंप नेमका किती तीव्रतेचा होता हे कळू शकलेले नाही; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून अधूनमधून बसणाऱ्या धक्‍क्‍यांमुळे डहाणू आणि तलासरीवरील भूकंपाची टांगती तलवार अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.
Web Title: Earthquake Dahanu Talasari

टॅग्स