esakal | "पादचाऱ्यांनी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे झेब्रा क्रॉसिंग असल्याशिवाय ओलांडू नये"
sakal

बोलून बातमी शोधा

Eastern express highway

"पादचाऱ्यांनी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे झेब्रा क्रॉसिंग असल्याशिवाय ओलांडू नये"

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : झेब्रा क्राॅसिंगवरुन (Zebra Crossing) पादचाऱ्याने (Pedestrian) रस्ता न ओलांडल्यामुळे अपघाती (Accident case) मृत्यू झालेल्या एका प्रकरणात विक्रोळी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (Mumbai session court) दुचाकिस्वाराला दोषमुक्त जाहीर केले आहे. पादचाऱ्यांनी ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग (eastern express way) झेब्रा क्राॅसिंग असल्याशिवाय ओलांडता कामा नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

हेही वाचा: ह्रदयविकाराचे प्रमाण दुपटीने वाढले; धुम्रपानाचा आरोग्यावर घातक परिणाम

ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर ऑगस्ट 2017 मध्ये एका साठ वर्षी महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. एका दुचाकिस्वाराची धडक तिला लागली आणि ती जखमी झाली. चेंबूर येथील कामराज नगर या परिसरात हा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर दुचाकिस्वार निघून गेला होता. पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. तपासामध्ये होंडा एक्टिव्हा चालविणाऱ्या दुचाकिस्वाराची धडक महिलेला लागल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपीला भादंवि कलम 304 अ (बेदरकारपणे वाहन चालविणे) आणि अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल केला.

यावर न्या. एस. एस. पारवे यांच्यापुढे नुकतीच खटल्याची कारवाई पूर्ण झाली. उपलब्ध कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या जबानीवरुन फूटपाथ घटनास्थळापासून 35 फूट दूर होता तर रोड दुभाजक 15 फूट अंतरावर होता, हे सिध्द झाले. यावरून पादचारी महिला रस्त्याच्या मध्येच रस्ता ओलांडून जात होती, असे दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने निकालामध्ये नोंदविले आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग झेब्रा क्रौसिंग असल्याशिवाय ओलांडू नये हे सर्वज्ञात आहे. ज्याठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी झेब्रा क्रौसिंग होते याचा अधिक्रुत पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे जरी असे मान्य केले कि आरोपीच्या सुसाट बाईक चालविण्यामुळे अपघात झाला तरी त्याचा या प्रकरणाशी संबंध लावता येऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

loading image
go to top