

Eastern Freeway Accident
ESakal
मुंबई : मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. अपघात टाळणे तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र ईस्टर्न फ्रीवेवरील या नियमाचे उल्लंघन झाले असून एका भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.