तुमचं आमचं जीवनमान उंचवणाऱ्या नद्यांसाठीचा आजचा दिवस, वाचा स्पेशल रिपोर्ट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई - जगभरातील अनेक मोठी शहरं ही नदीकिनारी वसलेली आहेत. अशात नद्या आणि आपलं आयुष्य हे एकमेकांशी कशाप्रकारे निगडित आहे हे अधोरिखित होतं. आज १४ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस. जगभरात नदी संरक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी आणि बदलत्या हवामानाचं महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र यामागचा इतिहास, यामागची पार्श्वभूमी आणि याबद्दलच्या काही फॅक्ट तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत. 

मुंबई - जगभरातील अनेक मोठी शहरं ही नदीकिनारी वसलेली आहेत. अशात नद्या आणि आपलं आयुष्य हे एकमेकांशी कशाप्रकारे निगडित आहे हे अधोरिखित होतं. आज १४ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस. जगभरात नदी संरक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी आणि बदलत्या हवामानाचं महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र यामागचा इतिहास, यामागची पार्श्वभूमी आणि याबद्दलच्या काही फॅक्ट तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत. 

आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस या दिवशी जगभरात काही कार्यक्रम आयोजित केले जातात. यात काही पर्यावरण आणि नदीप्रेमी  एकत्र येऊन नदीला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांना विरोध करतात. याआधी हा दिवस आंतरराष्ट्रीय धरण विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात होता. नद्यांचं, पाण्याचं आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचं संरक्षण व्हावं म्हणून हा दिवस करण्यात येत होता. भारतातही काही संघटनांकडून यासंदर्भात 'नर्मदा बचाव अभियान' यासारखे कार्यक्रम राबवले होते. 

हेही वाचा: 'सरोगसी' म्हणजे काय रे भाऊ ? जाणून घ्या डिटेल्स 

काय आहे आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस २०२० चं थिम:

'महिला, नदी आणि हवामान बदल' अशी यंदाच्या आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवसाचं थिम आहे. मागील वर्षी जगातील ३२ देशांच्या १०० महिलांनी नदी संरक्षण करण्यासाठी मेहनत घेतली होती. 

"बदलत्या हवामानामुळे महापूर येतात आणि पाण्याचं प्रदूषण होतं त्यामुळे नद्यांचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. ज्या लोकांनी नदी संरक्षणासाठी आपला आयुष्य वेचलं आहे त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत.आम्ही काही संघटनांसोबत आणि एनजीओसोबत मिळून नदी संरक्षणाचं काम करणार आहोत",असं या महिलांचं म्हणणं होतं.

VIDEO - तब्ब्ल ८८ प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट मांडवा जेट्टीजवळ बुडाली

आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवसाचा इतिहास:

नदीवर धरण बांधण्याच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांची बैठक मार्च महिन्यात १९९७ ला घेण्यात आली होती. ब्राझीलमध्ये ही बैठक घेण्यात आली होती. यानंतर जगातल्या २० देशांनी १४ मार्च हा आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी दिली होती.  

हा दिवस कसा कराल साजरा: 

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे मोठे कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली नाहीये त्यामुळे हा दिवस ऑनलाईनच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्या मित्रांना त्यांचा फोटो त्यांच्या आवडत्या नदीसोबत पोस्ट करायला सांगा आणि त्यांना #DayofActionforRivers and #RiversUniteUs हे हॅशटॅग वापरायला सांगा.तसंच नद्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत प्रार्थना करू शकता.  

हेही वाचा: आईचा ताबा सुटला आणि ६ महिन्याच्या मुलीनं गमावला जीव... 

काही देशांमधील धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या संघटना नदी वाचवण्याच्या संदर्भात काम करत आहेत. त्यापैकी काही खंड यामध्ये सक्रिय आहेत. आफ्रिका, दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका हे खंड आणि या खंडातील काही देश या नदी संरक्षणात सक्रिय सहभागी आहेत. 

special article on international day of Action for rivers read its importance


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article on international day of Action for rivers read its importance