कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट; कल्याण पूर्वेतील धक्कादायक प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कल्याण पूर्वेतील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची भीती दाखवून रुग्णांकडून जादा पैसे घेण्यात येत आहेत.

कल्याण : कल्याण पूर्वेतील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची भीती दाखवून रुग्णांकडून जादा पैसे घेण्यात येत आहेत.

ही बातमी वाचली का? वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

कल्याण, डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काही खासगी रुग्णालयात अन्य आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले जात नाही. उपचारासाठी दाखल करुन घेतल्यास त्या रुग्णांकडून अव्वाच्यासव्वा बिल उकळले जात असल्याचा प्रकार कल्याण पूर्वेतील खासगी रुग्णालयात समोर आला आहे. 

ही बातमी वाचली का?  Breaking : मुंबईच्या ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा फोन... यंत्रणा अलर्ट

कल्याण पूर्वेत राहणारे रवींद्र राजभर हे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील मल्टीस्पेशलीस्ट हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर मॅनेजमेंटने उपचाराच्या बिलामध्ये तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारल्याचे नमूद केले. हा प्रकार राजभर यांच्या नातेवाईकांनी कल्याण पूर्वमधील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांना सांगितला. त्यानंतर गायकवाड यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालय प्रशासनास धारेवर धरत बिलाची रक्कम कमी करून घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economical robbery of patients fear of corona; Shocking incidents in Kalyan East