मोठी बातमी >> कृषी खात्यातील दक्षता विभागाकडून ED ने मागवलीत महत्त्वाची कागदपत्रे

सुमित बागुल
Monday, 4 January 2021

वर्ष 2008 ते वर्ष 2011 या काळात हा घोटाळा झाला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी अनेकांचं निलंबन देखील केलं होतं

मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे मागे ED ची चौकशी लागली असतानाच आता राज्याच्या कृषी विभागाचीही ईडीमार्फत चौकशी होणार असल्याचं समजतंय. राज्यात वर्ष 2008 ते वर्ष 2011 या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिचंन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. ठिबक आणि तुषार सिंचन साहित्याच्या खरेदीत झालेला हा घोटाळा त्या काळी खूपच गाजला होता. या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने कृषी खात्यातील दक्षता विभागाकडून काही कागदपत्र मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महत्त्वाची बातमी : बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे ED चौकशीचा ससेमिरा लागलाय. यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या सूक्ष्म विभागातुन ED ने काही महत्त्वाची कागदपत्रे मागवलेली आहेत. वर्ष 2008 ते वर्ष 2011 या काळात हा घोटाळा झाला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी अनेकांचं निलंबन देखील केलं होतं. तब्बल चारशे ते पाचशे जणांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आता ED ने जी कागदपत्रे मागितली आहेत त्यानंतर या प्रकरणात चैकशी होणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाच्या साहित्यामध्ये करोडोंचा भष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali

आधीच महाविकास आघाडी नेत्यांच्या मागे ED  चौकशीचा ससेमिरा असताना आता थेट महाराष्ट्र सरकारच्यामागे ED कारवाईचा ससेमिरा लागणार आहे. आता यामध्ये ED कशा प्रकारे कारवाई करणार ? कुणाला चौकशीसाठी बोलावणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. 

ED asked for some important documents from agricultural department of maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED asked for some important documents from agricultural department of maharashtra