प्रताप सरनाईकांकडे आढळलं पाकिस्तानी क्रेडिट कार्ड ? सरनाईकांनी स्वतः केला याबाबत खुलासा

सुमित बागुल
Saturday, 12 December 2020

ED कडूनही आपल्याला कोणताही समन्स आलेला नाही यावरही सरनाईक यांनी खुलासा केला आहे. 

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची नुकतीच सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ED ने चौकशी केली. मुंबईतील ED कार्यालयात तब्बल सात तास प्रताप सरनाईक यांची चैकशी करण्यात आली. दरम्यान, ED ने जेंव्हा प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि ऑफिसवर धाड टाकली तेंव्हा ED ला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची बातमी समोर येतेय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. जेंव्हा ED ने प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि ऑफिसवर छापेमारी केली तेंव्हा ED ला एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे, अशा बातम्या प्रसारित झालेल्या. . 

Powerat80 : डॉक्टरांनी सांगितलं होतं, "तुमच्याकडे केवळ ६ महिने शिल्लक आहेत"; यावर शरद पवार म्हणाले होते...

दरम्यान, याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत म्हणालेत की, "ही केवळ चर्चा आहे, असं काही असेल तर अधिकृतपणे सांगावं. आमचे प्रताप सरनाईक हे या प्रश्नांना उत्तर देण्यास समर्थ आहेत" अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.    

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार प्रताप सरनाईक यांच्या घरी सापडलेलं क्रेडिट कार्ड हे सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड कॅलिफोर्निया मधील फेयरमॉन्ट बँकेकडून देण्यात आलं आहे. मात्र यावर सरनाईक यांचा पत्ता आहे. यामुळे प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे अशा बातम्या चालवल्या गेलेल्या . 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे , कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरारच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा  ।  Marathi News From Mumbai

प्रताप सरनाईक यांचा खुलासा 

प्रताप सरनाईक यांनी या बातम्यांचे खंडन केले आहे. ज्या माध्यमांनी अशा खोट्या बातम्या चालवल्या आहेत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठिकणार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. दरम्यान ED कडूनही आपल्याला कोणताही समन्स आलेला नाही यावरही सरनाईक यांनी खुलासा केला आहे. 

ED found pakistani credit card with the address of pratap sarnaik sanjay rauts reaction


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED found pakistani credit card with the address of pratap sarnaik sanjay rauts reaction